'विसरणे हा माणसाचा गुणधर्म असला तरी लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे' असे शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी, पहिल्याच तासाला, पहिले वाक्य शिकविणाऱ्या आणि मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या मनात येणाऱ्या छोट्यातील छोट्या प्रश्नांची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या, दौंड येथील शेठ ज्योती प्रसाद विद्यालयाच्या १९८३-८४ सालातील इयत्ता सहावीच्या आदरणीय शिक्षिका वाणीया बाई यांचा, त्यांच्या एका कृतज्ञ विद्यार्थ्याने त्यांच्या घरी जावून अनोखा सन्मान केला. सुमारे ४२ वर्षांनी इ. ६ वी ची मुले मला लक्षात ठेवतात हे पाहून वाणीया बाई आनंदीत झाल्या होत्या.
कलांगण ट्रॉफीजचे मालक व त्यांचे विद्यार्थी सचिन गटणे तसेच अविनाश जमदाडे आणि आनंद विणके यांनी मिळून हा 'कृतज्ञता सन्मान' सोहळा दौंड येथे आयोजित केला होता. सचिन गटणे यांनी त्यांच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये तयार केलेले हे सुंदर कृतज्ञता स्मृतिचिन्ह आणि भावुक संदेश देऊन आपल्या गुरुंबद्दलची कृतज्ञता दिनांक २९ मे २०२६ रोजी व्यक्त केली.
“वाणीया बाई, मी काढलेल्या प्रत्येक चित्राला तुम्ही योग्य तिथे शाबासिकी दिलीत आणि माझ्या कलाकारीतेच्या आयुष्याला सुरूवात झाली. आपली ती शाबसकीची थाप आजही आमच्या कलात्मकतेच्या व्यवसायात उपयोगी असते.”
असा तो कृतज्ञता संदेश आहे.
#KalanganTrophies#Awards#TeacherStudentBond #GuruShishya #EmotionalReunion #SchoolMemories #Respect Teachers #Inspiration #ProudMoment